Saturday, August 1, 2009

Bless me' 0' Lord

Bless me '0' Lord to be,

Man with no future

and a man with no past

and bless me with little honor

when I see myself at last

गर्दिश

गर्दिश में शामिल हो गये,
हम भी ये साहिब
जनाज़ा किस का था,
खुदा जाने

कशिश

पल में बिखरता
पल में संभलता हूँ
जीने की है कशिश के
जिए जाता हूँ मैं

ज़रूरत है जिंदगी में,
एक मकसद की
ज़रूरत है एक उमीद की

दस्तक

देनी है दस्तक जो ,
दिल ए आशना पे दिजीएगा
वरना गुलिस्ताँ हमारा,
तनहा ही अच्छा है

जलाना है चराग़,
तो चराग़ ए दिल जलाइएगा
वरना इस आशियाने में,
अंधेरा ही अच्छा है

दुआ यह करते हैं

दुआ यह करते हैं की
यह दुआ किसी के काम आए
हो हमपे इतना करम
ये जिंदगी किसी के काम आए

अमन

कुछ रवायत ही बदल गयी है जिंदगी की
जो देता है दुहाई अमन की,
वो घर में हमारे बारूद भी बिछाता है

दास्तान सुन लेंगे

दास्तान सुन लेंगे आप की भी
के शाम अभी बाकी है
पहले लम्हा दो लम्हा
इस तनहाई को भी सुन ले ए दोस्त

गुप्तगू होती रहेगी
शमायें बुझने तलाक़
पहले कुछ शमायें इस फलक पे
रोशन तो कर लेने दे ए दोस्त

















Thursday, July 30, 2009

अंतरे वाढली तरी

काही चेहर्‍यानी जगायला शिकवले,
काहींनी जिवापाड जपले.
अंतरे वाढली तरी
काही हात कधीच हातून सुटले नाहीत

कधी एका संध्याकाळी


कधी एका संध्याकाळी,
भेटली एक जुनी आठवण
हरवलो क्षणभर त्या बालपणात,
आसमंत दरवळला आठवणीने

ना जाणे का आज पुन्हा,
हरवण्याची उभारी जागते आहे
शोधावे कुणीतरी ह्या इच्छेने,
परत लपंडाव खेळावेसे वाटते आहे

साम्राज्य उभारायचे तर---

व्यकती महत्वाची नसून
ध्येय महत्वाचे
हे समजायला "अहम्"
सोडून लढ़णारे लोक लागतात

साम्राज्य उभारायचे तर
सोबत श्रध्दा बाळगणारे मावळे लागतात
अन तोफेचा आवाज़ येई पर्यंत
लढ़णारे बाजी लगतात

राजा कुणी उगाच होत नसतो
कुणालाही घड़वण्यात
इतराच्या रक्ताचे
पाट वाहत आसतात

क्षण काही वेचले



क्षण काही वेचले,
जपले अलगद ह्रदयाशी,
भाव तव मनीचे जाणले,
जाणता ना जाणता

गंध दरवळला मनी,
धुंदल्या दाही दिशा,
जीव गुंतला कधी ना कळे,
जाणता ना जाणता

आज मी उदास आहे

घे तव कुशीत की,
आज मी उदास आहे
नभ दाटले अंबरी जरी,
तरीही मनी तुझीच आस आहे

सांग मज कधी,
व्यथा तव मनीची
मलाही कळुदे कधी की,
कुणीतरी आसपास आहे

भावबंध का सांग कुणी,
व्यर्थ असे हे जोडते
जोडताना एक एक अक्षर,
मी तुलाच शोधतो आहे.

शब्दांपलीकडले

शब्दांपलीकडले शोधताना,
पुन्हा शब्दांचा आधार घ्यावा लागला
भावना मनीच्या मांडताना,
पुन्हा श्रोत्यांचा आधार घ्यावा लागला

बंधन पाश सैल करूनी,
धावलो दहिदिशा ध्येयासक्तीने
पाउले थकली सांजवेळी तेव्हा,
पुन्हा घराचा आधार घ्यावा लागला

Thursday, April 23, 2009

ध्यास


झेप ऊंच घेण्यासाठी
लागतो गगनभरारीचा ध्यास

लागते पंखात बळ
अन् "हो पुढ़े" म्हणणारा पाठीवर मायेचा हा

बरेच काही बोललो


बरेच काही बोललो पण,

महत्वाचे तेवढेच राहून गेले

तू माघारी जाताना,
पाठमोरे पाहायाचे राहून गेले


घरट्यातून बाहेर पड़ताना,
अंगन सुट्ले हे माहीत होते

ओढ़ मनी तव सदैव राहील,
हे घराला सांगणे राहून गेले

जिंकलेले सगळे किल्ले परत देताना,
एक किल्ल्ला मागायचे राहून गेले

बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले

आभास

किती आभासात,किती आकारात
शोधू तुला मी

येता आठवण तुझी पुन्हा
सांग कुठे भेटु तुला मी

शोध

देवळात देव शोधणं,
माणसात माणूस शोधण्यापेक्षा सोप असतं

गीतेची एक ओळ आत्मसात करण्याऐवजी,
रोज अख्खी गीता वाचणं सोप असतं