Thursday, July 30, 2009

साम्राज्य उभारायचे तर---

व्यकती महत्वाची नसून
ध्येय महत्वाचे
हे समजायला "अहम्"
सोडून लढ़णारे लोक लागतात

साम्राज्य उभारायचे तर
सोबत श्रध्दा बाळगणारे मावळे लागतात
अन तोफेचा आवाज़ येई पर्यंत
लढ़णारे बाजी लगतात

राजा कुणी उगाच होत नसतो
कुणालाही घड़वण्यात
इतराच्या रक्ताचे
पाट वाहत आसतात

No comments:

Post a Comment