Thursday, April 23, 2009
बरेच काही बोललो
बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले
तू माघारी जाताना,
पाठमोरे पाहायाचे राहून गेले
घरट्यातून बाहेर पड़ताना,
अंगन सुट्ले हे माहीत होते
ओढ़ मनी तव सदैव राहील,
हे घराला सांगणे राहून गेले
जिंकलेले सगळे किल्ले परत देताना,
एक किल्ल्ला मागायचे राहून गेले
बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment