Thursday, April 23, 2009
ध्यास
झेप ऊंच घेण्यासाठी
लागतो गगनभरारीचा ध्यास
लागते पंखात बळ
अन् "हो पुढ़े" म्हणणारा पाठीवर मायेचा हात
बरेच काही बोललो
बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले
तू माघारी जाताना,
पाठमोरे पाहायाचे राहून गेले
घरट्यातून बाहेर पड़ताना,
अंगन सुट्ले हे माहीत होते
ओढ़ मनी तव सदैव राहील,
हे घराला सांगणे राहून गेले
जिंकलेले सगळे किल्ले परत देताना,
एक किल्ल्ला मागायचे राहून गेले
बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले
शोध
देवळात देव शोधणं,
माणसात माणूस शोधण्यापेक्षा सोप असतं
गीतेची एक ओळ आत्मसात करण्याऐवजी,
रोज अख्खी गीता वाचणं सोप असतं
माणसात माणूस शोधण्यापेक्षा सोप असतं
गीतेची एक ओळ आत्मसात करण्याऐवजी,
रोज अख्खी गीता वाचणं सोप असतं
Subscribe to:
Comments (Atom)